Saturday, May 25, 2024
Homeक्रीडाIND vs NZ : भारताचे न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे आव्हान; विराट-अय्यरचे शतक

IND vs NZ : भारताचे न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे आव्हान; विराट-अय्यरचे शतक

मुंबई | Mumbai

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ICC ODI World Cup) स्पर्धेमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पहिला उपांत्य सामना मुंबईतील (Mumbai) वानखेडे मैदानावर होत आहे. आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या फांदाजांनी हा निर्णय सार्थकी ठरवत ५० षटकांत ४ गडी गमावत ३९७ धावांपर्यंत मजल मारली…

- Advertisement -

Advay Hiray : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक

भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने केली. रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि साऊदी या आघाडीच्या गोलंदाजांची लाईन लेंथ बिघडवत धावसंख्या वेगाने वाढवली. यावेळी दोघांनी पहिल्या विकेटसाठी भागीदारी केली. रोहित शर्माने २९ चेंडूमध्ये ४७ धावांचे योगदान दिले. यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. त्याला टीम साऊदीने माघारी धाडले.

NashiK Crime News : फटाके फोडण्याच्या वादातून युवकाची हत्या

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यामध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. यावेळी क्रॅम्प आल्यामुळे शुभमन गिलला मैदान सोडावे लागले. यानंतर कोहलीने अर्धशतक ठोकत भारताचा डाव सावरला. क्रॅम्प आल्यामुळे शुभमन गिल मैदानातून बाहेर गेल्यामुळे श्रेयस अय्यरने विराटची साथ दिली. त्यांनतर विराट कोहलीने आपले ५० वे शतक झळकावले. यानंतर ११३ चेंडूत ११७ धावांची खेळी करून तो बाद झाला.

Bus Accident News : प्रवाशांनी भरलेली बस २५० मीटर खोल दरीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

त्यानंतर श्रेयस अय्यर देखील शतक करून बाद झाला. त्याने ७० चेंडूत १०५ धावांची वादळी खेळी केली ज्यामध्ये आठ षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. तर सूर्यकुमार यादवला देखील मोठी खेळी करता आली नाही.अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात अवघी एक धाव काढून सूर्यकुमार यादव बाद झाला. तर के एल राहुल ४२ आणि शुभमन गिल ८० धावांवर नाबाद राहिला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मनोज जरांगेची आजपासून पुन्हा तोफ धडाडणार; ‘या’ जिल्ह्यात घेणार सभा

- Advertisment -

ताज्या बातम्या