दिल्ली | Delhi
जागतिक भूक निर्देशांकात (Global Hunger Index) इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घरसरण झाल्याचं समोर आलं आहे. जागतिक भूक निर्देशांक यादीमध्ये पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आदी दशांनी भारताला मागे टाकले आहे.
- Advertisement -
जागतिक भूक निर्देशांकत भारत यापूर्वी १०१ व्या स्थानावर होता. तिथून भारताची घसरण १०७ व्या स्थानावर झाली आहे. भारताच्या आधी नेपाळ (८१), पाकिस्तान (९९), श्रीलंका (६४) आणि बांगलादेश (८४) या शेजारी देशांची क्रमवारी लागते.
ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूकेचे सर्वसमावेशक मोजमाप आणि मागोवा घेण्यासाठीचे एक साधन असून, GHI स्कोअरची गणना १०० -पॉइंट स्केलवर केली जाते. ज्यावरून संबंधित देशातील भुकेची तीव्रता दर्शवली जाते. यात शून्य हा सर्वोत्तम स्कोअर असतो आणि १०० हा सर्वात वाईट स्कोअर मानला जातो.