Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; 'या' खेळाडूंना मिळाली...

Asia Cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

मुंबई | Mumbai

येत्या ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकसाठी (Asia Cup) भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषकात उतरणार आहे. आशिया चषक हा विश्वचषकासाठी रंगीत तालीम असल्याने भारतीय संघ संपूर्ण ताकदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला

- Advertisement -

Maharashtra Politics : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही फुट पडणार? शिंदेंच्या शिवसेनेतील ‘या’ खासदाराचा दावा

आशिया चषकासाठी युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्माला (Tilak Verma) संधी देण्यात आली आहे. तर फिरकीपटू युजवेन्द्र चहलचा (Yuzvendra Chahal) पत्ता कट झाला आहे. तसेच के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे देखील भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

Video : कांदा निर्यात शुल्काच्या विरोधात स्वाभिमानीचा रास्ता रोको

आशिया चषकासाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Talathi Exam : सर्व्हर डाऊनमुळे खोळंबा, तलाठी भरती परिक्षेच्या पेपरची वेळ बदलली

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या