मुंबई | Mumbai
नुकतेच भारतीय संघाने (Indian Team) नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आशिया चषकाचे (Asia Cup) आठवे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे…
New Parliament : नव्या संसदेचा आजपासून ‘श्रीगणेशा’, खासदारांना मिळणार खास गिफ्ट
यात पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद लोकेश राहुलकडे (Lokesh Rahul) देण्यात आले असून उपकर्णधारपद रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) असणार आहे. तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. तसेच या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर आर अश्विनचे संघात पुनरागमन झाले असून फलंदाजीची मदार लोकेश राहुल, ईशान किशन,शुभमन गील, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव यांच्यावर असणार आहे.
Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनावेळी वरुणराजा लावणार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार
तसेच अष्टपैलूमध्ये आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा हे असून गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांच्यावर असणार आहे. तर पहिला एकदिवसीय सामना मोहाली येथे होणार असून दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना इंदूर आणि राजकोटमध्ये (Indore and Rajkot) होणार आहे .हे सर्व सामने २२, २४ आणि २७ सप्टेंबर रोजी होणार आहेत.
Ganeshotsav 2023 : गणपती माझा नाचत आला! राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, बाप्पाचे जल्लोषात स्वागत
भारतीय संघ खालीलप्रमाणे
केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
सलिल परांजपे नाशिक
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
‘विघ्नहर्ता’ जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, मुख्यमंत्र्यांची गणेशाचरणी प्रार्थना!