Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाWomens T20 WC : महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर; कोणाला...

Womens T20 WC : महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर; कोणाला मिळाली संधी?

दिल्ली । Delhi

महिला T20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने (BCCI) महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket Team) घोषणा केली आहे. 15 खेळाडूंच्या यादीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदी स्मृती मंधानाची वर्णी लागली आहे.

- Advertisement -

महिला T20 विश्वचषकासाठी भारताचा संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी , रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.

हे हि वाचा : गो…गो…गो…गोविंदा! दहीहंडीनिमित्त राज्यभरात उत्साह, महिला गोविंदांनी ‘मटकी’…

ट्रॅव्हलिंग रिजर्व : उमा छेत्री (यष्टीरक्षक), तनुजा कंवर, सायमा ठाकोर.

नॉन ट्रॅव्हलिंग रिजर्व : राघवी बिस्ट, प्रिया मिश्रा.

भारतीय महिला संघाचे वेळापत्रक

४ ऑक्टोबर, शुक्रवार, भारत वि. न्यूझीलंड, दुबई
६ ऑक्टोबर, रविवार, भारत वि. पाकिस्तान, दुबई
९ ऑक्टोबर, बुधवार, भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
१३ ऑक्टोबर, रविवार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह

हे हि वाचा : बंगालमध्ये आंदोलन पेटलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या