Sunday, June 14, 2026
Homeमुख्य बातम्याIndia Squad vs Australia Series 2025 : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या 'अ' संघाची...

India Squad vs Australia Series 2025 : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या ‘अ’ संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूकडे संघाची धुरा

नवी दिल्ली | New Delhi

बीसीसीआयने शनिवारी भारताचा 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. हा संघ 16 सप्टेंबरपासून लखनौ येथे होणार्‍या दोन बहुदिवसीय सामन्यांत ऑस्ट्रेलिया विरुद्ध उतरणार आहे. श्रेयस अय्यरला भारताचे कर्णधारपद मिळाले आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल याची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. संघात साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांचाही समावेश आहे. हे तिघे नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत झळकले होते.

- Advertisement -

बीसीसीआयने या दोन सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे. 16 सप्टेंबरपासून लखनौमध्ये भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जाईल. यानंतर, 23 सप्टेंबरपासून लखनौमधील एकाना येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाईल. यानंतर, कानपूरमध्ये तीन एकदिवसीय सामने देखील खेळवले जातील. अनधिकृत कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान होऊ शकते.

तसेच के. एल. राहुल आणि मोहम्मद सिराज दुसर्‍या सामन्यापासून संघात सहभागी होतील. त्यासाठी पहिल्या सामन्यानंतर दोन खेळाडूंना वगळले जाणार आहे. या मालिकेत अभिमन्यू ईश्वरन, तनुष कोटियन आणि एन. जगदीशन यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल. हे तिघे अलीकडच्या काळात कसोटी संघाच्या उंबरठ्यावर आहेत, पण अद्याप पदार्पण बाकी आहे.

भारत अ संघाची घोषणा –

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, एन जगदीसन, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.

ताज्या बातम्या

Solapur News : भीषण अपघात! पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविकांचा जागीच...

0
सोलापूर । Solapur सोलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवदर्शनाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळाने घाला घातला आहे....