Sunday, October 4, 2026
Homeक्रीडाआयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI कडून भारतीय संघाची घोषणा! अय्यर कर्णधार, वैभव...

आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI कडून भारतीय संघाची घोषणा! अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री; वाचा Squads

मुंबई । Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि जपानमधील आशियाई खेळांसाठी अचानक टी-२० संघाची घोषणा करत क्रिकेट विश्वाला मोठा धक्का दिला आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील ‘क्रिकेट हाऊस’ येथे झालेल्या बैठकीत असे काही धाडसी आणि चक्रावून टाकणारे निर्णय घेण्यात आले, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. नुकताच भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला मोठा धक्का देत निवड समितीने संघाची धुरा थेट श्रेयस अय्यरकडे सोपवली आहे.

- Advertisement -

डिसेंबर २०२३ पासून भारतीय टी-२० संघातून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने थेट कर्णधार म्हणूनच संघात पुनरागमन केले आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे दिग्गज पर्याय उपलब्ध असतानाही निवड समितीने अय्यरच्या नेतृत्व कौशल्यावार आणि अनुभवावर विश्वास दाखवला. मधल्या फळीत डाव सावरणारा आणि दबावाच्या परिस्थितीत धावांची गती कायम ठेवणारा हुकमी खेळाडू म्हणून श्रेयसकडे पाहिले जात आहे. आयपीएलमधील त्याचे उत्कृष्ट नेतृत्व आणि फॉर्मचा फायदा भारतीय संघाला आगामी काळात होईल, असा विश्वास निवडकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या अत्यंत खराब फॉर्मशी झुंजत असल्याने त्याला संघातून विश्रांती देण्यात आल्याचे समजते.

या संघ निवडीतील सर्वात ऐतिहासिक आणि कौतुकास्पद निर्णय म्हणजे १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात झालेला समावेश. आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या अतरंगी आणि तुफानी फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट जगताला थक्क करणाऱ्या वैभवला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. वैभवने आयपीएल २०२६ मध्ये १६ सामन्यांमध्ये तब्बल ७७६ धावा कुटत ‘ऑरेंज कॅप’वर आपले नाव कोरले होते. एकाच हंगामात ७२ षटकार ठोकणारा आणि २३७.३० चा चक्रावून टाकणारा स्ट्राईक रेट राखणाऱ्या या वंडर बॉयला बीसीसीआयने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकीट दिले आहे.

दौऱ्यांचे वेळापत्रक आणि संघ खालीलप्रमाणे:

भारताचा आयर्लंड आणि इंग्लंड दौरा (टी-२० संघ): श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

आयर्लंड दौरा वेळापत्रक: २६ जून (पहिला टी-२०, बेलफास्ट), २८ जून (दुसरा टी-२०, बेलफास्ट).

इंग्लंड दौरा वेळापत्रक: ०१ जुलै ते ११ जुलै दरम्यान ५ सामन्यांची मालिका (चेस्टर-ली-स्ट्रीट, मँचेस्टर, नॉटिंगहॅम, ब्रिस्टल, साऊदॅम्पटन येथे सामने होतील).

आशियाई क्रीडा स्पर्धा (जपान) भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.

एकंदरीत, बीसीसीआयने युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधत भविष्यातील टीम इंडियाची पायाभरणी सुरू केली आहे. श्रेयसचे नेतृत्व आणि वैभवची फटकेबाजी पाहण्यासाठी आता भारतीय क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad BJP List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची...

0
मुंबई | Mumbai भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि...