Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाबिसब्रेन कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

बिसब्रेन कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

मुंबई । Mumbai

शुभमन गिल ९१ धावा व रिषभ पंत च्या ८९ धावांच्या जोरावर टीम इंडियाने बिसब्रेन मध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन टेस्टच्या अंतिम दिवशी शिस्तबद्ध कामगिरीने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. विराटच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणेने नेतृत्वाची जबाबदारी चोख बजावली आणि संघाचे विजयी नेतृत्व केले. यासह रहाणेने डाऊन अंडर कसोटी मालिका जिंकणारा फक्त दुसरा भारतीय कर्णधार ठरला.

यापूर्वी संघाने 2016-17 मध्ये देशात आयोजित त्यानंतर 2018-19 आणि 2020-21 मध्ये डाऊन अंडर विजय मिळवण्याचा कारनामा केला आहे. टीम इंडियासाठी हा मालिका विजय अनेक मानाने खास ठरला.

टीम इंडियाच्या विजयात रहाणेचे नेतृत्व आणि नवख्या खेळाडूंच्या दमदार खेळीने निर्णायक भूमिका बजावली. मुख्य गोलंदाजांच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिजर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारख्या नवोदित गोलंदाजांनी जबाबदारी सांभाळली तर फलंदाजीत शुभमन गिल, रिषभ पंतने मोलाचा वाट उचलला. सिराजने टेस्टमध्ये पहिल्यांदा 5 विकेट काढल्या तर शार्दूल-सुंदरच्या शतकी भागीदारीने संघाचे आव्हान कायम ठेवले होते.

ब्रिस्बेनच्या गब्बा येथे झालेल्या सामन्यात शुभमनने सर्वाधिक 91 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने त्याला चांगली साथ दिली आणि शतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. पुजाराने या दरम्यान 28 वे कसोटी अर्धशतक करत 56 धावा केल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या