Monday, November 25, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023 : अफगाणिस्तानविरुद्ध भारताची कामगिरी कशी?

World Cup 2023 : अफगाणिस्तानविरुद्ध भारताची कामगिरी कशी?

दिल्ली | Delhi

विश्वचषक २०२३ (ODI World Cup 2023) मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) सामना रंगणार आहे. टीम इंडिया (Team India) ने विश्वचषकाची (ICC World Cup 2023) सुरुवात ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या विजयी सलामीने केली आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तान (Afghanistan Cricket Team) संघाला सलामी सामन्यात बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आज टीम इंडिया आणि अफगाणिस्तान संघ विश्वचषकातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडिअम (Arun Jaitley Stadium) वर दुपारी दोन वाजता आजचा सामना पार पडणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तानचे संघ चौथ्यांदा एकदिवसीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत. याआधी भारताने तीन सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत. तर, एक सामना बरोबरीत सुटला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २०१४ मध्ये मीरपूर येथे खेळला गेला होता. हा सामना भारताने ८ विकेट्स राखून जिंकला होता. त्यानंतर २०१८ मध्ये दुबईत खेळण्यात आलेल्या दोन्ही संघामधील सामना बरोबरीत सुटला होता. तर, २०१९ मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अफगाणिस्तानच्या संघाला ११ धावांनी पराभूत केले होते. चार वर्षांनंतर आता दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत.

दरम्यान आज दिल्लीत हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज दिल्लीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. बुधवारी, ११ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत पावसाची शक्यता नाही. दिल्लीत बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत हवामान अंशतः ढगाळ असेल पण पावसाची शक्यता फारच कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमाल तापमान ३५-३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९-२३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळे चाहते आजच्या सामन्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतील.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या