Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाIND vs AUS CWC 2023 : आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये महामुकाबला; कोण होणार विश्वविजेता?

IND vs AUS CWC 2023 : आज भारत-ऑस्ट्रेलियामध्ये महामुकाबला; कोण होणार विश्वविजेता?

अहमदाबाद | Ahmedabad

आज आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये (ICC ODI World Cup) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यातअंतिम सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत सलग १० सामने जिंकले असून विश्वविजेतेपद पटकावून सलग ११ सामन्यात विजय संपादन करण्याची भारताला संधी असणार आहे…

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने (india) विजय संपादन करून विश्वचषक स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियावर विजय संपादन करून विश्वचषकावर नाव कोरून १२ वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची भारतीय संघाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात संधी मिळणार आहे. याआधी २००३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा सामना झाला होता. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे.

Chhagan Bhujbal : “तुम्ही एका समाजाची…”; मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या संभाजीराजेंना भुजबळांचे प्रत्युत्तर

तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील अंतिम सामना पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि २०११ साली भारतीय क्रिकेट संघाला दुसरा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. तर अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघात सुर्यकुमार यादव किंवा मोहम्मद सिराज यांच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत १३ सामने खेळविण्यात आले आहेत. यामध्ये भारताने ५ तर ऑस्ट्रेलियाने ८ सामन्यात विजय संपादन केला आहे. तसेच आज सामन्याच्या दिवशी पावसाची (Rain) शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर ऑस्ट्रेलियाने भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारून व सलग ८ सामन्यात विजय संपादन करून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Manoj Jarange patil : “छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या