Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी उद्या पासून

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी उद्या पासून

मेलबर्न l Melbourne

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारी २६ डिसेंबर पासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर पहाटे ०५:३० वाजल्यापासून भारतीय प्रमाण वेळेनुसार करण्यात येणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी करो या मरो असा असणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली पुत्रप्राप्तीसाठी मायदेशी परतला आहे. त्यामुळे पुढील ३ सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य राहणेकडे सोपवण्यात आले आहे.

शिवाय भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ मागील सामन्यात अपयशी ठरला होता. त्याच्याजागी शुभमन गिल किंवा लोकेश राहुल याला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहंमद शमी दुखापतग्रस्त झाला असून, त्याच्याजागी मोहंमद सिराज किंवा नवदीप सैनीला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

पहिल्या सामन्यातील पराभवामुळे आत्मविश्वास खचलेला भारतीय संघ नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या फलंदाजीत बदल केला जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित सलामीवीर डेविड वॉर्नर संघात पुनरागमन करणार आहे. त्याला ज्यो बर्न्स किंवा म्यॅथ्यु वेडजागी संघात स्थान दिले जाऊ शकते. ऑस्ट्रेलिया संघ हा सामना जिंकून मालिकेत आपली आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी सज्ज आहे.

ऑस्ट्रेलिया संघासाठी जमेची बाजू म्हणजे मर्नास लबुशेन आणि टीम पेन हे फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. त्यांना इतर फलंदाजांची साथ मिळणे गरजेचे आहे. गोलंदाजीत पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ आहेत.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यात दोघांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही संघाला अशीच कामगिरीची या दोन गोलंदाजांकडून अपेक्षा असेल.

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास चेतेश्वर पुजारा अजिंक्य राहणे चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांना पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नव्हता. दुसऱ्या कसोटीत या दोघांवर फलंदाजीची भिस्त असणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थीतीत त्यांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

गोलंदाजीत आर अश्विन उमेश यादव आणि जसप्रीत बुमरा यांना आपल्या गोलंदाजीत कामगिरी सुधारावी लागणार आहे. कारण मोहंमद शमी खेळणार नसल्यामुळे नवदीप सैनी किंवा मोहंमद सिराज यांना आर अश्विन जसप्रीत बुमरा आणि उमेश यादव या तिघांकडून चांगले मार्गदर्शन मिळू शकेल.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार पृथ्वी शॉ, शुभमन गील, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे, रिषभ पंत, लोकेश राहुल, वृद्धिमान सहा यांच्यावर असणार आहे.

अष्टपैलूंमध्ये हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन आहेत. गोलंदाजीची मदार, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, मोहंमद सिराज, नवदीप सैनी, कुलदीप यादव आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची भिस्त डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मीथ, जो बर्नन्स, विल पुकोस्कीयांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये मर्नास लबुशेन, मायकल नेसर, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड आहेत. यष्टीरक्षक म्हणून टीम पेन आणि म्याथ्युवेड आहेत. गोलंदाजीत पॅट कमिन्स, जेम्स पॅटिन्सन, शॉन एबोट, मिचेल स्टार्क, नेथन लायन आहेत.

: सलिल परांजपे, देशदूत, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या