Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाIND vs AUS : विहारी-अश्विनची कमाल, तिसरा कसोटी सामना अनिर्णीत

IND vs AUS : विहारी-अश्विनची कमाल, तिसरा कसोटी सामना अनिर्णीत

मुंबई | Mumbai

ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारताने यश मिळवलं आहे. त्यामुळे ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी कायम आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचा खूपच हिरमोड झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ४०७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघ करत असताना पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १ षटक बाकी होते, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाने हस्तोंदलन करुन हा सामना अनिर्णित अवस्थेत थांबवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

पाचव्या दिवशी फलंदाजी करताना विहारीनं १६१ चेंडूचा सामना केला. तर अश्विननं विहारीला संयमी साथ देत १२८ चेंडूचा सामना केला. एकवेळ भारतीय संघ सामना गमावेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या जोडीनं संयमी आणि चिवट फलंदाजी करत २५९ चेंडूचा सामना करत भारताचा पराभव टाळला. ऑस्ट्रेलियानं विहारी-अश्विन यांची जोडी फोडण्यासाठी पराकठीचे प्रयत्न केले. कर्णधार पेन यानं तर स्लेजिंगचाही वापर केला. मात्र, अश्विन-विहारी यांनी आपला संयम ढासळू देता भारताचा पराभव टाळला. यांच्या फलंदाजीचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.

भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला. पण त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याने सुरूवातीला सावध खेळ केला, पण नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.

ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी यांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली. रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त होता. त्यातच भर म्हणून हनुमा विहारीला दुखपत झाली. हनुमा विहारीला धावणेही कठीण झालं होतं. त्यामुळे अश्विन आणि हनुमा विहारीनं सामना वाचवण्याच्या दृष्टीनं फलंदाजी केली. अश्विन-विहारी यांनी संयमी फलंदाजी करत अखेर सामना वाचवला. विहारीनं नाबाद २३ तर अश्विननं नाबाद ३९ धावांची खेळी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या