मुंबई | Mumbai
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय (Three ODI) सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज गुजरातमधील (Gujrat) राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्रच्या मैदानावर होणार आहे. दुपारी १.३० वाजता हा सामना सुरु होणार असून प्रेक्षकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स १८ वर पाहता येणार आहे…
Asian Games 2023 : भारताची पदकांची लयलुट सुरूच; सिफ्ट सामराची नेमबाजीत सुवर्णपदकाला गवसणी
भारताने मोहाली आणि इंदूर (Mohali and Indore) येथील एकदिवसीय सामने जिंकून मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तर आजच्या सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) संघात पुनरागमन करणार आहेत.
Nashik Rain News : नाशिकमध्ये सकाळी ऊन तर दुपारी पाऊस; नागरिकांचे हाल
दुसरीकडे रोहित शर्माच्या कर्णधारपदात विजयी हॅट्रिक साधण्यासाठी आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ICC ODI World Cup) स्पर्धेमध्ये आत्मविश्वासाने सहभागी होण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. मात्र, राजकोट येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघामध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. तर भारताकडून शुभमन गिल, शार्दूल ठाकूर, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी या सामन्यातून माघार घेण्याची शक्यता आहे.
Nashik News : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; तिघे जखमी
तसेच दुखापतीमुळे फिरकीपटू अक्षर पटेल (Akshar Patel) खेळू शकणार नाही. त्यामुळे रोहित शर्मा आजच्या सामन्यात अंतिम ११ मध्ये कुणाला संधी देतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघासाठी हा सामना निव्वळ एक औपचारिकता असणार असून अखेरचा सामना जिंकून विजयी शेवट करण्याचा कांगारुंचा प्रयत्न असणार आहे. तसेच या सामन्यात पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क कमबॅक करण्याची शक्यता आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Iraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू