Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIND vs BAN T20 Series : आज भारत-बांगलादेश यांच्यात निर्णायक टी २०...

IND vs BAN T20 Series : आज भारत-बांगलादेश यांच्यात निर्णायक टी २० सामना

नवी दिल्ली | New Delhi

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात तीन सामन्यांच्या टी २० मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेत ग्वालियर येथील माधवराव सिंधिया स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळताना ७ गडी राखून विजय संपादन करून मालिकेत (Series) विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता मालिकेतील दुसरा सामना नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर आज रात्री खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Women’s T20 World Cup : आज भारत-श्रीलंका आमनेसामने; कोण जिंकणार?

बांगलादेशचे (Bangladesh) नेतृत्व नजमूल हुसेन शांतोकडे (Hussain Shanto) असणार असून मालिकेतील बरोबरी साधण्यासाठी बांगलादेश संघ मैदानावर उतरणार आहे. तर ग्वालियरमध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात विजय संपादन केल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आता दिल्ली (Delhi) येथील सामन्यात विजय संपादन करून मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी; आजपासून जोर वाढणार

दरम्यान, भारत आणि बांगलादेश संघांमध्ये १५ टी २० सामने खेळविण्यात आले आहेत. यात भारतीय संघाने (Team India) १४ तर बांगलादेश संघाने १ विजय मिळविला आहे. भारत विरुद्ध बांगलादेश संघांमध्ये भारतात ४ टी २० सामने खेळविण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ४ तर बांगलादेशने १ विजय संपादन केला आहे.तर २०१९ मध्ये बांगलादेश संघाने अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारतीय संघाला पराभूत केले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...