Thursday, May 23, 2024
Homeक्रीडाIND Vs NZ : भारत-न्यूझीलंड आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

IND Vs NZ : भारत-न्यूझीलंड आज आमनेसामने; कोण मारणार बाजी?

धर्मशाला | Dharamshala

आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप (ICC World Cup 2023) स्पर्धेमध्ये भारतीय (India) क्रिकेट संघासमोर रविवारी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघांचे तगडे आव्हान असणार आहे. हा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी २:०० वाजता खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी आपल्या सलामीच्या ४ सामन्यात विजय संपादन केला आहे.आता गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.

भारतीय क्रिकेट संघाची धुरा रोहित शर्माकडे असणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद टोम लेथमडे असणार आहे. दोन्ही संघांनी गुणतालिकेत अव्वल दोन संघांमध्ये आपलं स्थान निश्चित केले असल्यामुळे एक रोमांचक सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींना संधी मिळणार आहे.

मात्र आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघाने भारतीय क्रिकेट संघाला कायमच पराभूत केले आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी न्यूझीलंड सज्ज असणार आहे. तर भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी स्पर्धांमध्ये पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी मिळणार आहे.

मात्र भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला बांगलादेश विरुध्द दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा भाग नसणार आहे. त्याच्याजागी भारतीय संघात महंमद शमी किंवा सुर्यकुमार यादव यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाल्यास रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स, विलयंग, डेवीन कोनवे, फॉर्मात आहेत. मागील ३ सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरलेल्या टोम लेथमला अखेर सुर गवसला आहे.

गोलंदाजीमधे मेट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लोकी फर्ग्युसन,मिचेल सेंटेंनर गोलंदाजी मध्ये निर्णायक क्षणी विकेट्स काढून संघाचा विजय निश्चित करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, फॉर्मात आहेत.याशिवाय सलामीवीर शुभमन गीलने बांगलादेश विरुध्द शानदार अर्धशतक झळकावून आपल्याला लय गवसली असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

गोलंदाजी मध्ये जसप्रीत बुमराह, महमंद सिराज, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा संघाला बळी मिळवुन देत प्रतिस्पर्धी संघांवर दबाव टाकत आहेत. सामन्याच्या दिवशी ढगाळ वातावरण राहणार असून, पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आमनेसामने ११६

भारत विजयी ५८

न्यूझीलंड विजयी ५०

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या