Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाIND vs NZ : आज भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामना; कुणाचे पारडे जड?

IND vs NZ : आज भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामना; कुणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ICC ODI World Cup) स्पर्धेमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पहिला उपांत्य सामना मुंबईतील (Mumbai) वानखेडे मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता हा सामना सुरु होणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) तर न्यूझीलंडचे आजच्या सामन्यातील नेतृत्व केन विल्यमसन (Kane Williamson) करणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या हंगामात ८ सामन्यात अपराजित राहुन उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी झालेल्या भारतीय संघाला (Indian team) आपला विजयरथ निर्णायक सामन्यामध्ये कायम राखण्याची संधी असणार आहे. तर भारतीय संघाने आजवर झालेल्या सर्वच सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

दुसरीकडे सलामीच्या ४ लढतीत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडला आपल्या पुढच्या ४ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) मोठ्या फरकाने शानदार विजय संपादन केला होता. मात्र इंग्लंड आणि पाकिस्तान सामन्याच्या निकालावर उपांत्य फेरीचे स्थान अवलंबून असलेल्या न्यूझीलंडला अखेर दिलासा मिळाला. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे न्यूझीलंडचे उपांत्य फेरीचे तिकीट कन्फर्म झाले होते.

तसेच भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर,चांगली कामगिरी करत आहेत. मात्र भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागील काही सामन्यात मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे उपांत्य सामन्यात रोहित शर्माकडून मोठी खेळी अपेक्षित असणार आहे. तर गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव भारतीय संघाला मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट्स काढून देत आहेत.

तर न्यूझीलंडचे विलयंग, केन विल्यमसन, डेरेल मिचेल, रचिन रविंद्र फॉर्मात आहेत. मात्र, टोम लेथमला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला आपली कामगिरी उंचावण्याची संधी असणार आहे. तसेच गोलंदाजीमध्ये, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, मिचेल सॅटनर, ग्लेन फिलिप्स संघाला विकेट्स काढून देत आहेत. दोन्ही संघांची तुलना केल्यास भारतीय संघाची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे.

कसे असेल हवामान?

हवामान संकेतस्थळ Accuweather नुसार, मुंबईत सूर्यप्रकाश असेल आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. ताशी १४ किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि ४४ टक्के आर्द्रता असल्याने पावसाचा धोका नाही. मात्र, रात्री दव पडण्याची खात्री आहे. अशा परिस्थितीत, नंतरच्या १०-१५ षटकांमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी येऊ शकतात.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या