Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजIND vs PAK : आज भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत

IND vs PAK : आज भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत

नाणेफेकीचा कौल ठरणार निर्णायक

नवी दिल्ली | New Delhi

टी-२० विश्वचषक २०२४ (T20 World Cup) मध्ये आज रविवार (दि.९ जून) रोजी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरु होणार आहे. टी-२० विश्वचषकात भारताचा पाकिस्तान संघावर वरचष्मा राहिला आहे. मात्र, या सामन्यात नाणेफेक मोठी भूमिका बजावू शकते. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, २००७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील, अशा प्रकारे भारत-पाक सामन्यात नाणेफेक निर्णायक ठरणार आहे.

- Advertisement -

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले गेले आहेत. भारताने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ७ पैकी ६. सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे. २००७ च्या विश्वचषकानंतर टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ५ सामने खेळले गेले आहेत. यात २००९ आणि २०१० मध्ये दोघांमध्ये एकही सामना झाला नव्हता. २०१२ च्या टी-२० विश्वचषकापासून आतापर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध ४ सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत.

नाणेफेक जिंकणारा संघ मारणार बाजी?

आज रविवार (दि. ९ जून) रोजी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल, तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा होईल, असे विक्रम दर्शवित आहेत. त्यामुळे आजच्या पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणार संघ सामना जिंकताना दिसत आहे.

२००७ नंतरच्या टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तानची कामगिरी

टी-२० विश्वचषक २०१२ स्पर्धेत भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला होता, यानंतर, २०१४ च्या टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, जिथे भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला होता. २०१६ च्या टी-२० विश्वचषकात भारताने धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला होता. यानंतर २०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने एकमेव सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. यानंतर २०२२ च्या टी-२० विश्वचषकात भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला.

भारत-पाकिस्तान सामना म्हणजे युद्ध नाही!

बीसीसीआयशी बोलताना हार्दिक पंड्याने सांगितले की, हे युद्ध नाही, फक्त सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक असतात. तसेच भावनांचा महापूर उसळतो, परंतु मला आशा आहे की आम्ही शिस्तबद्ध कामगिरी करू आणि एक यूनिट म्हणून आमचे ध्येय साध्य करू आपण हे करू शकलो तर आणखी एक दिवस चांगला जाईल. टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताला फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या