मुंबई | Mumbai
एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup 2023) यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवला जाणार आहे. ५ ऑक्टोबर २०२३ पासून एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार असून स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. या विश्वचषकात जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष्य भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यातील सामन्याकडे असणार असून आता या सामन्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे….
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर भारतीय संघ (Team India)विश्वचषकातील आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यासंदर्भात संभाव्य वेळापत्रक बीसीसीआयने (BCCI) आयसीसीसोबत शेअर केले असून लवकरच विश्वचषकाबाबत आयसीसीकडून (ICC) वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तसेच या वेळापत्रकावर सर्व देशांकडून अभिप्राय घेण्यात आला असून पुढील आठवड्यापर्यंत वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते.
Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चार प्रवाशांचा मृत्यू तर चार गंभीर जखमी
या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे ९ सामने होणार असून प्रत्येक सामना वेगवेगळ्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. यात भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे तर दुसरा सामना ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत खेळविला जाणार आहे. तसेच तिसरा सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे पाकिस्तानशी आणि चौथा सामना १९ ऑक्टोबरला बांगलादेशसोबत पुण्यात होणार आहे.
Nashik Accident News : तीन वाहनांचा विचित्र अपघात; चार जखमी
याशिवाय पाचवा सामना २२ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध धर्मशाला येथे तर सहावा सामना २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध लखनऊ येथे खेळविला जाणार आहे. तर सातवा सामना २ नोव्हेंबरला मुंबईत क्वालिफायर संघाविरुद्ध होणार असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठवा सामना ५ नोव्हेंबरला कोलकत्ता येथे होणार आहे. तर ११ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये क्वालिफायर संघाविरुद्ध नववा सामना होणार आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढणार; काय आहे प्रकरण?
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार असून सर्व संघांचे प्रत्येकी ९ लीग सामने होणार आहेत. त्यामधील प्रथम चार संघ सेमी फायनलमध्ये जातील. याआधी २०१९ साली इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.