नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर (India Pakistan Border) प्रचंड तणाव बघायला मिळत आहे. भारत कुठल्याही क्षणी हल्ला करेल असा पाकिस्तानकडून कांगावा केला जात आहे. अशातच आता भारत-पाकिस्तान सीमेवरील अमृतसर (Amrutsar) येथे दहशतवादी हल्ल्याचा (Terror Attack) मोठा कट उधळून लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) समन्वयाने अमृतसर जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ दहशतवादी कट उधळून लावला असून, शस्त्रारते आणि दारूगोळ्याचा साठा जप्त केला आहे. बीएसएफ इंटेलिजेंस विंगने दिलेल्या माहितीच्या आधारे, बुधवारी संध्याकाळी संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांना दोन हातबॉम्ब, तीन पिस्तूल, सहा मॅगझिन आणि ५० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
तसेच पुढील चौकशीसाठी जप्त केलेली रास्ते आणि स्फोटके स्थानिक पोलिसांकडे (Police) सोपवण्यात आली आहेत. समन्वय साधून करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये बीएसएफ आणि पंजाब पोलिसांची सर्तकता आणि तयारी दिसून आली. अत्यंत चपळाईने समन्वय साधून ही कारवाई करण्यात केली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली असून , कधी, कुठून कसा हल्ला होईल ही भिती पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर वाढलेल्या सुरक्षा चिंतांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. या हल्ल्यानंतर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यांविरोधात सैन्य सतर्क आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती, यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे.