नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan War) लष्करी महासंचालकांनी ऑपरेशन्सच्या हॉटलाईनवर चर्चा केली आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या युद्धबंदी उल्लंघनांवर (Line of Control) चर्चा केली. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या युद्धबंदी उल्लंघनांविरुद्ध भारताने पाकिस्तानला इशारा दिला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत (Pahalgam Terrorist Attack) संपूर्ण देश दहशतवादाचा सूत्रधार पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी करत आहे. पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानने धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील उपस्थित होते. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान काल अनेक बैठका झाल्या.
केंद्रीय गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक (Meeting) झाली. या बैठकीत केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक, आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि एसएसबीकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर वोनी त्यांचे कुवेती समकक्ष अब्दुल्ला अली अल-याह्या यांना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा केली. केंद्र सरकारने (Central Government) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांना अध्यक्ष बनवण्यात आले आहे.