Saturday, January 24, 2026
Homeक्रीडाIndia vs South Africa 3rd ODI : भारताने 9 विकेट्सने दक्षिण आफ्रिकेचा...

India vs South Africa 3rd ODI : भारताने 9 विकेट्सने दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा

विशाखापट्टनम | Visakhapatnam

भारताने तिसर्‍या आणि अंतिम सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली आहे. के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आहे. भारताने 271 धावांचं आव्हान हे 39.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केली आहे. भारताच्या या विजयात यशस्वी जैस्वाल याने शतक केले आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी अर्धशतक झळकावले आहे.

- Advertisement -

भारताने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. विशाखापट्टनम येथे खेळल्या गेलेल्या निर्णायक तिसर्‍या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेटने धुव्वा उडवला. आधी गोलंदाजीत कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी घातक मारा केला. त्यानंतर भारतीय फलंदाजांत यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी तुफानी कामगिरी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. तब्बल नऊ महिन्यांच्या अंतरानंतर भारतातील मैदानात खेळताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही वनडे मालिका अत्यंत संस्मरणीय ठरली आहे.

YouTube video player

लक्ष्याच्या पाठलागात यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्माने भारताला जबरदस्त सुरूवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली. रोहितने या सामन्यात आपले 61वे वनडे अर्धशतक केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण केल्या. रोहित 75 धावांवर फलंदाजी करून बाद झाला. यानंतर मैदानात विराट कोहली आला, त्याने या मालिकेत सातत्याने आपली ताकद दाखवली आहे. दरम्यान, यशस्वीने आपल्या वनडे करिअरातील पहिले शतक ठोकले आणि भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

कोहलीने सलग चौथ्या सामन्यात अर्धशतक ठोकले. यशस्वीने 12 चौके आणि 2 षटकारांसह 121 चेंडूत 116 धावा केल्या, तर कोहलीने 45 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 65 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने फक्त केशव महाराजला फलंदाजीत यश मिळाले.

ताज्या बातम्या

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात येथील एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या प्रकाराने शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने...