Monday, April 28, 2025
Homeक्रीडाभारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा T20 सामना

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा T20 सामना

मुंबई | Mumbai

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) यांच्यातील ३ टी २० सामन्यांच्या (T20 matches) मालिकेतील दुसरा सामना आज गुवाहाटीच्या (Guwahati) बरसपरा मैदानावर (Barapara Ground) खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे…

- Advertisement -

भारताने (Team India) पहिला सामना ८ गडी राखून जिंकला होता. त्यानंतर आजचा सामना दोन्ही संघासाठी जिंकणे महत्वाचे असणार आहे. २०१५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात भारतात खेळल्या गेलेल्या टी २० मालिकेत आफ्रिकेला एकदाही मालिका विजय मिळवता आलेला नाही. तसेच पहिल्या सामन्यात भारताकडून के एल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी दिमाखदार खेळी केली होती.

दरम्यान आज कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या फलंदाजीतून मोठी खेळी करत चाहत्यांना सामना जिंकून वर्ल्डकप स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी विजयादशमीची गोड भेट देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर आजच्या सामन्यात रोहित शर्मा, डेविड मिलर, विराट कोहली (Virat Kohli) हे स्टार प्लेअर्स राहणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...