Wednesday, May 22, 2024
Homeक्रीडाInd vs SL Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना आज;...

Ind vs SL Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना आज; कुणाचं पारडं जड?

कोलंबो | Colombo

३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये सुपर इलेव्हन आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा सलामी सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळविण्यात आला होता. हंगामात अंतिम सामन्यात कोणते दोन संघ आमनेसामने येणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता.

- Advertisement -

मात्र याचे उत्तर अखेर मिळालं आहे. स्पर्धेचा महाअंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघांमध्ये होणार आहे. भारत रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आठवे विजेतेपद जिंकण्यासाठी मैदानावर उतरण्यासाठी सज्ज असणार आहे.तर श्रीलंका सातव्या विजेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

हा सामना आर के प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनी वर करण्यात येणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघांमध्ये सुपर ४ मध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका क्रिकेट संघाचा पराभव केला होता.या पराभवाचा वचपा काढण्याची संधी श्रीलंका संघाकडे असणार आहे.

शहरानंतर आता जिल्ह्याचंही नामांतर; ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’वर शिक्कामोर्तब

दसून शनाका नेतृत्व करत असलेल्या श्रीलंका संघाने २०२२ मध्ये टी २० आशिया चषक जिंकला होता. आता ५० षटकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेवर सलग दोन वेळा आपलं नांव कोरण्याची संधी श्रीलंका संघाकडे असणार आहे.

सुपर ४ मध्ये श्रीलंका संघाने पाकिस्तान क्रिकेट संघाचा पराभव करत अंतिम सामन्यात थाटात आपला प्रवेश निश्चित केला आहे.तर भारतीय क्रिकेट संघाला बांगलादेश संघाने ६ धावांनी पराभूत करून सुपर ४ मध्ये विजयी शेवट केला आहे.हा पराभव विसरून नव्या उमेदीने मैदानावर उतरण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे.

Accident News : ट्रक मोटारसायकल अपघातात तिघे ठार, मृतांत दीड वर्षाची चिमुकली

सामन्याच्या दिवशी ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३२ असून, दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १९१ आहे.

कमाल तापमान ३० ते २५ अंश सेल्सिअस असणार आहे. मात्र श्रीलंका संघाचा फिरकी गोलंदाज महेश तीक्षाणा दुखापतग्रस्त झाला आहे.याशिवाय अष्टपैलू वनिंदू हसरंगा दुखापतीमुळे आशिया चषका्तून बाहेर झाला असल्यामुळे श्रीलंका संघाची डोकेदुखी वाढली आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Rain Alert : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कमबॅक, कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? वाचा…

- Advertisment -

ताज्या बातम्या