कोलंबो | Colombo
भारत विरद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील अंतिम सामना सुरू आहे. कोलंबोच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -
तर भारतीय संघ गोलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. दरम्यान भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने भारतीय संघाकडून दमदार कामगिरी केली आहे. या दमदार गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांवर संपुष्टात आला आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला ५१ धावांची गरज आहे.