Wednesday, June 19, 2024
Homeक्रीडाIND vs SL : रोहित सेना आज श्रीलंकेशी भिडणार; भारताला उपांत्य फेरी...

IND vs SL : रोहित सेना आज श्रीलंकेशी भिडणार; भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ICC ODI World Cup) स्पर्धेमध्ये आज भारताचा मुकाबला श्रीलंकेशी मुंबईतील वानखेडे मैदानावर (Wankhede Maidan) होणार आहे. भारताने याआधी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश यांचा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय संघ फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. हा सामना दुपारी दोन वाजता सुरु होणार असून सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे…

भारताला आजचा सामना जिंकून आपली विजयी लय कायम ठेवून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. २०११ नंतर तब्बल १२ वर्षांनी भारत आणि श्रीलंका (India and Sri Lanka) यांच्यात पुन्हा एकदा वानखेडेवर सामना होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कामगिरीचा विचार केला असता भारतीय संघाची कामगिरी श्रीलंकेच्या तुलनेत सातत्यपूर्ण राहिली आहे.

Maratha Reservation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची घेणार भेट

तसेच सध्या भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली,लोकेश राहुल फॉर्ममध्ये आहे. मात्र, सलामीवीर फलंदाज शुभमन गील, श्रेयस अय्यर या दोन्ही खेळाडूंकडून भारतीय संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तर मागील ५ सामन्यात मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या सूर्यकुमार यादवला लय गवसली असून गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह फॉर्मात आहेत. त्यांना रविंद्र जडेजा, कुलदीप यादव,यांची सुरेख साथ मिळत आहे..

तर श्रीलंकेकडून (Sri Lanka) कुशल मेंडीस, पथुम निसांका, सदिरा समरविकरमा चांगली कामगिरी करत असल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तसेच गोलंदाजीमध्ये दिलशान मधुशंका, महेश तीक्षाणा, कसून रजिथा यांच्यासह गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. याशिवाय भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत १६७ एकदिवसीय सामने खेळविण्यात आले असून यामध्ये भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. भारताने ९८ तर श्रीलंकेने ५७ सामन्यात विजय संपादन केला असून ११ सामने अनिकाली राहिले आहेत.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची आज ईडीकडून चौकशी; म्हणाले,”चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत…”

दरम्यान, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ९ सामने खेळविण्यात आले असून दोन्ही संघांनी ४-४ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना अनिकली राहिला आहे. तर दोन्ही संघांची तुलना केल्यास श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला विजयाची सर्वाधिक संधी असणार आहे

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

लाचेची मागणी झाल्यास बिनधास्त तक्रार करा

- Advertisment -

ताज्या बातम्या