Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIND vs WI : भारत-वेस्टइंडिज यांच्यात आज चौथा टी २० सामना; भारताला...

IND vs WI : भारत-वेस्टइंडिज यांच्यात आज चौथा टी २० सामना; भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी

मुंबई | Mumbai

भारत आणि वेस्टइंडिज (India and West Indies) यांच्यात सुरू असलेल्या ५ टी २० सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी २० सामना आज शनिवारी होणार आहे. हा सामना अमेरिकेतील (America) फ्लोरिडा येथे खेळविला जाणार असून भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे…

- Advertisement -

Medha Kulkarni : काल नाराजी आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी, चांदणी चौक लोकार्पण सोहळा चर्चेत

वेस्टइंडिजने सलामीच्या दोन लढतींमध्ये शानदार विजय (Victory) संपादन करत मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली होती. मात्र, भारताने तिसरा सामना ७ गडी राखून जिंकल्याने मालिका विजय संपादन करण्यासाठी उत्सुक असलेल्या वेस्टइंडिजचा हिरमोड झाला. त्यानंतर आता चौथा सामना (Match) जिंकून मालिकेत २-२ ने बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाला संधी असणार आहे.

Fire News : भीषण अग्नितांडवात ६७ जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, या मैदानावर आत्तापर्यंत ११ टी २० सामने झाले असून त्यातील ९ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तसेच येथील खेळपट्टी संथ असल्यामुळे फिरकी गोलंदाज निर्णायक भूमिका बजावू शकतात. तर या मैदानावरील सरासरी धावसंख्या १६० ते १७० इतकी असून भारतीय संघाने (Indian Team) ४ टी २० खेळले आहेत. त्यापैकी २ भारताने जिंकले असून एकामध्ये पराभव आणि एक सामना रद्द झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : त्र्यंबकेश्वरला भाविकांची मांदियाळी; कमला एकादशी आणि शनिवारचा साधला पर्वकाळ

- Advertisment -

ताज्या बातम्या