मुंबई । Mumbai
भारतीय संघ (Indian team) इंग्लंड दौरा (England tour) आटोपून वेस्ट इंडिज दौऱ्यावर (West Indies tour) जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज (India & West Indies) संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामन्यांची मालिका (Series) होणार आहे. नुकतेच या मालिकेचे वेळापत्रक (Schedule) वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून (West Indies Cricket Board) जाहीर करण्यात आले आहे…
या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचे २ टी – २० सामने फ्लोरिडाच्या क्रिकेट मैदानावर (Florida Cricket stadium) खेळविण्यात येणार आहेत. तसेच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेची (ODI series) सुरुवात पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल (Queen’s Park Oval) येथील सामन्याने होणार आहे. तर टी २० आंतरराष्ट्रीय (International) सामने तीन वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज (India & West Indies) यांच्यातील पहिला वनडे सामना २२ जुलै, दुसरा २४ जुलै तर तिसरा २७ जुलै रोजी खेळविण्यात येणार आहे. हे तिन्ही सामने पोर्ट ऑफ स्पेन या मैदानावर होणार आहेत. तसेच हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरु होतील.
तसेच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी २० सामना (T 20 match) २९ जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथे खेळविण्यात येणार आहे. तर दुसरा व तिसरा टी २० सामना अनुक्रमे १ व २ ऑगस्ट रोजी सेंट किट्स अँड नेव्हीस (Saint Kitts and Nevis) येथील मैदानावर (stadium) खेळविण्यात येणार आहे. तसेच चौथा व पाचवा टी २० सामना अनुक्रमे ६ व ७ ऑगस्टला फ्लोरिडा (Florida) येथे होणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ८ वाजता सुरु होतील.
सलिल परांजपे, नाशिक