मुंबई | Mumbai
भारत विरुद्ध वेस्टइंडिज (India vs West Indies) यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू असून या मालिकेत भारतीय संघाने (Indian Team) १-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना होत असून सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि डिडी स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे…
Sharad Pawar : शरद पवार ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर
आजच्या सामन्यात विजय संपादन करून मालिकेवर ताबा मिळविण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर वेस्टइंडिज संघाला सामन्यात विजय संपादन करून मालिकेत १-१ ने बरोबरी साधण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी २००६ मध्ये वेस्टइंडिजने भारताविरुद्ध अखेरचा मालिका विजय (Series Win) संपादन केला होता. त्यानंतर मागील ५ वर्षात भारतीय संघाने वेस्टइंडिजविरुद्ध सातत्याने मालिका विजय संपादन केला आहे. यानंतर ही परंपरा कायम राखण्यासाठी भारताचा इरादा असणार आहे.
Nashik : टोमॅटोने शेतकऱ्यांना बनवले कोट्याधीश; जिल्ह्यात लावलेल्या बॅनरची होतेय सर्वत्र चर्चा
दरम्यान, सलामीच्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी (Bowlers) केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघाचा विजयाचा मार्ग सुकर केला होता. तर मोहम्मद सिराजचा पर्यायी खेळाडू म्हणून भारतीय संघात संधी देण्यात आलेल्या मुकेश कुमार, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांनी केलेल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडिज संघाला ११४ धावांवर रोखले होते. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली होती.
सलील परांजपे, नाशिक
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
NCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं