Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाIND vs WI : भारत-वेस्टइंडीज कसोटी मालिका उद्यापासून

IND vs WI : भारत-वेस्टइंडीज कसोटी मालिका उद्यापासून

मुंबई | Mumbai

भारत विरुद्ध वेस्टइंडीज (India vs West Indies) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला (Test Series) उद्या (दि.१२ जुलै) पासून सुरूवात होणार आहे. या मालिकेची विजयी सुरूवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत…

- Advertisement -

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) स्पर्धेत सलामीच्या दोन हंगामात भारताला उपविजेतेपद पटकावण्यात यश मिळाले होते. पंरतु, मागील दोन हंगामामध्ये विजेतेपद मिळविण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आहे. त्यानंतर आता भारतीय संघ (Indian Team) काही युवा व नवीन खेळाडूंसह वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेमध्ये उतरून तिसऱ्या हंगामातील विजेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.

“माझा कलंक शब्द इतका…”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल

भारतीय संघामध्ये ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अनुपस्थितीत स्थान मिळालेल्या के.एस. भरत मागील काही सामन्यांमध्ये आपली छाप पाडण्यामध्ये अपयशी ठरला आहे. त्यामुळे वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये त्याला भारतीय संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर ईशान किशनवर (Ishan Kishan) यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जैसवाल यापैकी एका खेळाडूला चेतेश्वर पुजाराचा बदली खेळाडू म्हणून तिसऱ्या स्थानासाठी बढती मिळण्याची शक्यता आहे.

Nashik Accident News : ओमनी-अर्टिगाचा भीषण अपघात; तीन वर्षाच्या बालकासह एकाचा मृत्यू

तसेच भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit Sharma) भूषवणार असून वेस्टइंडीजचे कर्णधारपद क्रेगबरेथवेट असणाऱ् आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणार असून सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमावर मोफत करण्यात येणार आहे. तसेच येथील खेळपट्टी संतुलित असून नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.

पिंपळगाव बसवंत येथे आढळला ‘पोवळा’ साप

दरम्यान, भारत-वेस्टइंडीज हे दोन्ही संघ कसोटी सामन्यांमध्ये ५२ वेळा एकमेकांशी भिडले असून भारताने २२ सामन्यांमध्ये विजय संपादन केला. तसेच दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २४ कसोटी मालिका झाल्या असून भारतीय संघाने दहा सामन्यात विजय संपादन केला आहे. तर वेस्टइंडीजने १२ मालिकेत विजय मिळविला आहे.

सलिल परांजपे, नाशिक

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या