Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाआजपासून रंगणार भारत-वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेचा थरार

आजपासून रंगणार भारत-वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेचा थरार

बार्बाडोस | Barbados

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) संघांमधील कसोटी मालिकेचा थरार नुकत्याच आटोपला आहे. आजपासून दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ब्रिजटाऊन बार्बाडोस येथे सुरुवात होणार आहे. मालिकेमधील पहिला सामना बार्बाडोस येथे खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. मालिकेची विजयी सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत. त्याचप्रमाणे कसोटी मालिकेमध्ये विजय संपादन केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेतून विंडीज संघावर आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघाला पराभूत करून कसोटी मालिकेमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विंडीज संघ सज्ज आहे. विंडीज संघाचे नेतृत्व शाही होपकडे असणार आहे. रोवमन पोवेल उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघांची धुरा रोहित शर्मा सांभाळणार आहे हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद असणार आहे. भारतीय संघासाठी वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी विंडीज विरुद्धची मालिका सराव मालिका असणार आहे.

विंडीज संघ भारतात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी अपात्र ठरला असल्यामुळे ही मालिका म्हणजे त्यांच्यासाठी औपचारिकता असणार आहे.मात्र भारतीय संघासाठी या मालिकेतून वर्ल्डकप स्पर्धेसाठी आपला अंतिम 11 चार चमू निश्चित करण्याची संधी असणार आहे. चौथ्या स्थानी कोणाला संधी द्यायची? त्याचप्रमाणे सलामीला कोणते दोन खेळाडू मैदानात उतरणार? तसेच यष्टिरक्षकाची जबाबदारी कोण स्वीकारणार? असे विविध प्रश्न या मालिकेमधून भारतीय संघाला सोडवण्याची संधी मिळणार आहे.

या मालिकेत भारतीय संघाला कसोटी मालिकेतील आपल्या कामगिरीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मा विराट कोहली यांना आपली लय संधी असणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघामधून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, रिषभ पंत यांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या