Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याIND vs PAK : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; रोहित शर्माचे शतक...

IND vs PAK : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; रोहित शर्माचे शतक हुकले

अहमदाबाद | Ahmedabad

भारताने विश्वचषक २०२३ च्या (World Cup 2023) तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा डाव १९१ धावांत संपुष्टात आणत सामन्यावर पकड निर्माण केली होती. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० तर मोहम्मद रिझवानने ४९ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचत भारताचे टेन्शन दिले होते. मात्र, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी पाकिस्तानची मधली फळी उडवली. त्यानंतर पांड्या आणि जडेजाने पाकिस्तानचा डाव ४३ षटकात गुंडाळला. त्यानंतर भारताने (India) पाकिस्तानचा (Pakistan) ७ गडी राखून पराभव करत विजय मिळवला…

- Advertisement -

Cabinet Expansion : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीसांमध्ये तब्बल अडीच तास खलबतं

पाकिस्तानचे १९२ धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाने (Indian Team) आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र,रोहित फटकेबाजी करत असतानाच शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) भारताला शुभमन गिलच्या रूपाने पहिला धक्का दिला. त्याने गिलला १६ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला विराट कोहली देखील १६ धावांची भर घालून माघारी परतला. त्याला हसन अलीने बाद केले. मात्र रोहित शर्माने एका बाजूने दमदार फलंदाजी करत भारताला शतकाजवळ पोहचवले होते. त्याने ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

IND vs PAK : भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान ढेपाळला; १९१ वर ऑलआऊट

दरम्यान, यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर (Rohit Sharma and Shreyas Iyer) यांनी चांगली भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहीन आफ्रिदीने रोहितला माघारी धाडले. त्याने ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि के.एल राहुल यांनी धावसंख्या पुढे सरकवत भारताला ३०.३ षटकांत विजय मिळवून दिला. यात श्रेयस अय्यर ६३ चेंडूत ५३ धावा तर के एल राहुल २९ चेंडूत १९ धावा करून नाबाद राहिला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Chhagan Bhujbal : “मला मोठं केलं ते…”; छगन भुजबळांचे जरांगे पाटलांना प्रत्युत्तर

- Advertisment -

ताज्या बातम्या