Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशVideo : राजस्थानमध्ये लष्कराचं MIG-21 विमान घरावर कोसळलं

Video : राजस्थानमध्ये लष्कराचं MIG-21 विमान घरावर कोसळलं

हनुमानगड | Hanumangarh;

राजस्थानमध्ये (Rajasthan) हवाई दलाचे (Air Force) विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान (Mig-21 Fighter Aircraft) घरावर कोसळलं असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पायलट आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.

- Advertisement -

राजस्थानच्या हनुमानगडजवळ ही घटना घडली आहे. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते. पण अचानक हे विमान कोसळले. सुदैवाने या विमान अपघातामध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही. विमानचा पायलट सुरक्षित आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि ते जळून खाक झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या