नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय अलर्ट मोडवर आहेत. भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात तब्बल १७५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अनंतनाग पोलीस, लष्कर, सीआरपीएफ (CRPF) आणि इतर एजन्सींच्या संयुक्त पथकांनी जिल्ह्यात शोध मोहीम सुरु केली आहे. या कारवाई आतापर्यंत काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर काही दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांकडून सध्या दक्षिण काश्मीरमध्ये (South Kashmir) कारवाई सुरु आहे. सुरक्षा दलांनी गेल्या ४८ तासांत १७५ हून अधिक संशयित ताब्यात घेतले आहेत. तसेच काश्मीरमध्ये एकूण १४ स्थानिक दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहेत. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. तसेच पोलिसांकडून (Police) सर्वसामान्य नागरिकांना देखील महत्त्वाचे आवाहन केले जात आहे. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तातडीने कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर सरकारने देखील पहलगाम येथे सुरक्षेत काही चुक झाली असल्याची कबुली दिली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करण्यास सुरुवात केल असून, अनेक संशयितांना (Suspected) ताब्यात घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने देखील कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने भारतात असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तर २९ एप्रिलनंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे आदेशही केंद्र सरकारने दिले आहे. त्यासोबतच पाकिस्तानशी असणारा सिंधू पाणी करार देखील सरकारकडून स्थगित करण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या यादीतील काही दहशतवाद्यांची माहिती पुढीलप्रमाणे
१) आदिल रहमान देंतू – हा लष्कर-ए-तोयबा (LET) या संघटनेचा सोपोरमधील कमांडर आहे. तो २०२१ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. सध्या तो सोपोरचा जिल्हा कमांडर म्हणून काम पाहतो. तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर, आता तो मारला जाईल किंवा त्याचे घर जमीनदोस्त केले जाईल.
२) आसिफ अहमद शेख – हा जैश-ए-मोहम्मद (JeM) या संघटनेचा दहशतवादी आहे. तो अवंतीपुराचा जिल्हा कमांडर आहे. २०२२ पासून तो सतत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.
३) एहसान अहमद शेख – हा पुलवामामध्ये सक्रिय असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. तो २०२३ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत.
४) हरीश नजीर – हा पुलवामाचा दहशतवादी आहे आणि लष्कर-ए-तोयबामध्ये सक्रिय आहे. तो सुरक्षा दलाच्या रडारवर आहे.
५) आमिर नजीर वाणी – हा पुलवामामध्ये सक्रिय असून जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित आहे.
६) यावर अहमद भट्ट – हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी असून पुलवामामध्ये सक्रिय आहे.