Thursday, June 20, 2024
Homeजळगावगुढे येथील भारतीय सैन्य दलातील जवान राहुल माळी शहीद

गुढे येथील भारतीय सैन्य दलातील जवान राहुल माळी शहीद

गुढे ता.भडगाव – वार्ताहर bhadgaon

- Advertisement -

येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात (Indian Army) नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल श्रावण माळी (३४) हे भारत – बांगलादेश सीमेजवळ (India – Bangladesh border) पश्र्चिम बंगाल (West Bengal) येथील कंचनपुरा येथे दि.२७ देशसेवा बजावत असताना शहीद झाले त्यांच्या आकस्मित दु:खद घटनेने माळी परिवारावर मोठा आघात झाला असून यामुळे गावावर शोककळा पसरल्याने गुढे गावासह परिसरात या वीर शहीद जवानाबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांचे पार्थिव शरीर ताब्यात घेण्यासाठी त्याचे मोठे भाऊ अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले असून त्यांचे शुक्रवारी सायंकाळ पर्यंत गुढे या मुळ गावी येण्याची शक्यता आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान चिरंजीव राहुल श्रावण माळी हे १४ वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते ते आता पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे नायक पदावर सेवा बजावत असताना दि.२७ रोजी रात्री शहिद झाले. ते कुंटुबासह आर्मी सेंटर मध्ये वास्तव्यास होते बराकपूर येथील आर्मी हॉस्पीटल येथे आज शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव शरीर आज नातेवाईक यांच्या ताब्यात दिल्यानंतर ते गुढे मुळ गावी शुक्रवारी रात्री येण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, शिव वय वर्ष ४ व शंभु वय दीड वर्ष अशी लहान चिमुकले मुले आहेत. वडील, आई व दोन मोठे भाऊ वहिनी, पुतणे असा परिवार असून ते प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे लहान बंधू आहेत त्यांचा शासकीय इंतमामात गुढे जुवार्डी फाट्यवर मोठ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यासाठी ग्रामस्थ व मित्र परिवाराने तयारी सुरु केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या