Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशManipur : खळबळजनक! मणिपूरमध्ये जवानाचे अपहरण करून निर्घूण हत्या

Manipur : खळबळजनक! मणिपूरमध्ये जवानाचे अपहरण करून निर्घूण हत्या

दिल्ली | Delhi

- Advertisement -

मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार (Manipur Violence) हा सुरु आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. याचदरम्यान मणिपूरमधून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे

मणिपूरमध्ये भारतीय लष्कराच्या जवानाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. इंफाळच्या खुनिंगथेक गावात लष्कराच्या जवानाचा मृतदेह सापडला आहे. सेर्टो थांगथांग कोम असे या हवालदाराचे नाव आहे. मृत सैनिक लष्कराच्या डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स प्लाटूनमध्ये होता आणि सध्या कांगपोकपी जिल्ह्यातील लेमाखॉंग येथे तैनात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, थांगथांग कोम काही दिवस सुट्टीवर घरी आला होता. शनिवारी तीन सशस्त्र लोकांनी थांगथांग कोमचे त्यांच्या राहत्या घरातून बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांची गोळी झाडून हत्या केली. त्यांचा मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खुनिंगथेक गावात पोलिसांना सापडला.

या जवानाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान शहीद जवानाच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी सैन्याचे एक पथक त्यांच्या घरी पोहोचले आहे. भारतीय सैन्य या भ्याड हत्येचा तीव्र शब्दात निषेध करते आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबासोबत उभे राहील, असं सैन्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या