Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजICC Men's T20 World Cup - IND Vs WI : संजू स‍ॅमसनची...

ICC Men’s T20 World Cup – IND Vs WI : संजू स‍ॅमसनची धडाकेबाज फलंदाजी; वेस्ट इंडिजला नमवून भारतीय क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

कोलकाता | वृत्तसंस्था Kolkata

- Advertisement -

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना खेळण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यात विजय संपादन करून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज होते, वेस्ट इंडिजच्या संघाने २० षटकात ४ गडी बाद १९५ धावा करत १९६ धावांचे आव्हान भारतीय संघापुढे ठेवले. संजू स‍ॅमसनची धडाकेबाज फलंदाजी करत ५० चेंडूत नाबाद ९७ धावा करत भारतीय क्रिकेट संघाची विजयश्री खेचून आणली.२० व्या षटका अखेर भारतीय संघाने ५ गडी बाद १९९ धावा करत ५ गडी व ४ चेंडू राखून वेस्ट इंडीजच्या संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाई होप वआणि रोस्टन चेस वेस्ट इंडिजच्या संघाकडून सलामीला फलंदाजीस आले. वेस्ट इंडिजच्या संघाकडून सलामीला आलेल्या फलंदाजांकडून सावध पवित्रा घेत फलंदाजीस सुरुवात केली. सामन्याच्या ९ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूत वरून चक्रवर्तीने शाई होपला त्रिफळाचीत करत वेस्ट इंडिजच्या संघास पहिला धक्का दिला. शाई होपने ३३ चेंडूत ३२ धावा केल्या. १२ व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर संजू स‍ॅमसनने शिमरॉन हेटमायरला २७ धावांवर झेलबाद करत वेस्ट इंडिजच्या संघास दुसरा धक्का दिला. पाठोपाठ सलामीला आलेल्या रोस्टन चेसला सुर्यकुमार यादवने झेल बाद केले.रोस्टन चेसने २५ चेंडूत ४० धावा केल्या. १४ व्या षटका अखेर वेस्ट इंडिज संघाच्या ३ गडी बाद ११९ धावा होत्या.

१५ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर संजू स‍ॅमसनने शेरफेन रदरफोर्डला १४ धावांवर झेल केले. रोव्हमन पॉवेलने नाबाद ३४ धावा तर जेसन होल्डरने नाबाद ३७ धावा करत २० व्या षटका अखेर वेस्ट इंडिजच्या संघाने ४ गडी बाद १९५ धावा केल्या.

१९६ धावांचे लक्ष गाठत भारतीय संघाकडून संजू स‍ॅमसन व अभिषेक शर्मा प्रथम फलंदाजीस आले.सामन्याच्या तिसऱ्या षटकात अकेल होसीनच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरने अभिषेक शर्माला झेल बाद करत भारतीय संघाचा पहिला खेळाडू बाद केला. अभिषेक शर्माने ११ चेंडूत १० धावा केल्या ४थ्य षटकात शिमरॉन हेटमायर करवी ईशान किशन १० धावांवर झेल बाद झाला. १० व्या षटका अखेर २ गडी बाद ९८ धावा भारतीय संघाच्या होत्या. ११ व्या षटकात सुर्यकुमार यादव शेरफेन रदरफोर्ड करवी झेल बाद झाला सुर्यकुमार यादवने १६ चेंडूत १८ धावा केल्या. १५ व्या षटकाच्या अखेरीस शिमरॉनने तिलक वर्माला झेल बाद करत भारतीय संघाचा ४ था गडी बाद केला. तिलक वर्माने १५ चेंडूत २७ धावा केल्या. १५ व्या षटका अखेर भारतीय संघाने ४ गडे बाद १४६ धावा केल्या.

१९ व्या षटकात जेसन होल्डरने हार्दिक पांड्याला १७ धावांवर झेल बाद करत भारतीय संघाचा ५ वा खेळाडू बाद केला. अखेरच्या षटकात ६ चेंडूत ७ धावांची आवश्यकता असताना संजू स‍ॅमसन षट्कार लगावून दुसऱ्या चेंडूत अखेरची चौकार लगावत भारतीय संघाच्या १९९ धावा करत वेस्ट इंडीजवर विजय मिळविला.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; जून-जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.नाशिकमध्ये जून आणि जुलै...