Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशभारतीय अर्थव्यवस्था पुढील वर्षी घेणार मोठी झेप – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

भारतीय अर्थव्यवस्था पुढील वर्षी घेणार मोठी झेप – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

 सार्वमत 

नवी दिल्ली – भारताची अर्थव्यवस्था पुढील वर्षी मोठी उसळी घेईल आणि हा विकास दर 7.2 टक्क्यांपर्यंत जाईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराबाबत अंदाज वर्तवला आहे. यावर्षी मात्र कोरोनाच्या महासंकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर उणे 3 टक्क्यांपर्यंत खाली येईल, तर यावर्षी भारताचा विकास दर 1.9 टक्के इतका असेल.
कोरोना व्हायरसपासून आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी जगभरातच लॉकडाऊन आहे. उद्योग बंद असल्याने, त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे चालू आर्थिक वर्षात जगभरातील देशांना आर्थिक आघाडीवर मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी कोरोनाविरोधात ज्या पद्धतीने लढा सुरू केला आहे, त्याचे लवकरच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. भारत या संकटातून नक्कीच बाहेर पडेल आणि त्यानंतर आर्थिक आघाडीवरही काही ठोस उपाय केले जातील. ज्यांच्या परिणामाने पुढील आर्थिक वर्षाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था वेगाने भरारी घेणार आहे, असे नाणेनिधीने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसोबत जर्मनी, फ्रान्सआणि ब्रिटनसारख्याआघाडीच्या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही कोरोनाचा झटका बसला आहे. 2008-09 मधील मंदीपेक्षाही बिकट स्थिती या वर्षी असेल. अनेक देशांचा विकास दर उण्यावर जाणार असल्याचा नाणेनिधीचा अंदाज असताना, भारताचा विकास दर यावर्षी 1.9 टक्क्यांच्या घरात राहील, हे नाणेनिधीचे भाकीत सकारात्मक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या