Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशIndian Migrants: बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना विशेष विमानाने पाठवणी? स्थलांतरीतांविरोधात ट्रम्प प्रशासनाची...

Indian Migrants: बेकायदा वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना विशेष विमानाने पाठवणी? स्थलांतरीतांविरोधात ट्रम्प प्रशासनाची मोहिम तीव्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांविरुद्ध तीव्र कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना पुन्हा भारतात पाठवले जात आहे. अमेरिकेत हे लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत आहेत. अशा लोकांना पकडून त्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे. हा सर्व खर्च अमेरिकाच करत आहे. २०५ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे एक लष्करी विमान सी-१७ सॅन अँटोनियोहून अमृतसरकडे रवाना झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

रिपोर्टनुसार अमेरिकेचे सी-१७ हे विमान या अवैध लोकांना घेऊन निघाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना कळविले आहे. १८ हजार पेक्षा जास्त भारतीय लोक अमेरिकेत अवैधरित्या राहत आहेत. या लोकांचा व्हिसा संपला आहे किंवा ते अवैधरित्या अमेरिकेत दाखल झाले आहेत.

- Advertisement -

अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीत ट्रम्‍प यांनी स्‍थलांतरितांना हद्दपार करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने सुमारे १८,००० बेकायदा वास्‍तव्‍य असलेल्‍या भारतीय नागरिकांची पहिली यादीही तयार केली आहे. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या आकडेवारीनुसार, भारतातून सुमारे ७,२५,००० बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत राहतात, ज्यामुळे मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर अमेरिकेत अनधिकृत स्थलांतरितांची लाेकसंख्‍या असणारा भारत तिसरा देश आहे.

टेक्सासमधील एल पासो आणि कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथून ५,००० हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.लष्करी विमानांद्वारे स्थलांतरितांना ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे पाठवण्यात आले आहे, असे पेंटागॉनने म्हटले आहे.

भारतानेही मांडली होती भुमिका
अमेरिकेतील बेकायदा वास्‍तव्‍य करणार्‍या भारतीयांबाबत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आमचे काही नागरिक तेथे बेकायदेशीरपणे असतील तर ते पुन्‍हा भारतात वास्‍तव्‍यास येवू शकतात. दरम्‍यान, अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बेकायदेशीरपणे अमेरिकेत वास्‍तव्‍यास असलेल्‍या भारतीय स्थलांतरितांना परत मायदेशी घेण्याबाबत योग्य निर्णय घेतील.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...