Sunday, October 13, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूतच्या वृत्ताची दखल: भारतीय कांदा 2 जुलैपासून बांगलादेशात

देशदूतच्या वृत्ताची दखल: भारतीय कांदा 2 जुलैपासून बांगलादेशात

निफाड । प्रतिनिधी | Niphad

गेल्या काही महिन्यापासून बांगलादेश सरकारने (Government of Bangladesh) भारतीय कांद्याची आयात (Import of onions) थांबविल्याने बाजारभावात काहिसी घसरण झाली होती.

- Advertisement -

साहजिकच बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप (Market Committee Chairperson Suvarna Jagtap) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State for Health Bharti Pawar) यांचे मध्यस्थिने केंद्रीय वाणिज्य मंत्री तसेच कृषी मंत्री यांचेशी पत्रव्यवहार करीत कांदा निर्यात (Onion exports) करण्याची मागणी केली होती.

परिणामी केंद्र सरकारने (central government) याची दखल घेतल्याने अखेर 2 जुलै पासून बांगलादेश (Bangladesh) मध्ये भारतीय कांदा निर्यात (Indian onion exports) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साहजिकच कांदा निर्यातीमुळे बाजारभाव वाढण्यास मदत होणार आहे. कांदा निर्यातीबाबत देशदूतने (deshdoot) प्रथम 28 जून रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत केंद्र सरकारने बांगलादेशाशी संपर्क साधत निर्यात खुली करण्यासाठी सकारात्मक पावले उचलल्याने अखेरीस शनिवार दि.2 जुलैपासून कांदा निर्यात सुरू होणार आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारतीय कांदा चवदार व टिकावू असल्याने भारतीय उन्हाळ कांद्याला परदेशात मोठी मागणी असते. मात्र कांंदा निर्यातीसाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क मुल्य कमी करणे गरजेचे असते. निर्यात शुल्क कमी केल्यास कांदा निर्यात वाढून बाजारभावात वाढ होत असते. सद्यस्थितीत पावसाळा (monsoon) सुरू झाल्याने शेतकर्‍यांना खरिपाची पीके (Kharif crop) उभी करण्यासाठी भांडवल अर्थात पैशांची आवश्यकता असते.

अशावेळी शेतकरी (farmers) चाळीत साठविलेला कांदा विक्री करून भांडवल उभे करण्याला प्राधान्य देत असतो. मात्र आताची परिस्थिती बघता कांदा अवघा 1 हजार ते 1200 रुपये प्रति क्विंटल विक्री होत असल्याने या भावात कांदा पिकावरील खर्च फिटणे अवघड झाले आहे. त्यातच बांगलादेशासह इतर देशांनी देखील कांद्याची आयात थांबविली होती. मात्र आता या देशांनी कांदा आयातीला परवानगी दिली आहे. मात्र असे असले तरी तेथील देशांनी कांदा आयातीला परवानगी देणे गरजेचे आहे.

परवानगी मिळाल्यानंतर कांदा निर्यात होवू शकेल. साहजिकच कांदा निर्यात परवानगी मिळाल्यानंतर देखील 7 ते 8 दिवस कांदा निर्यातीसाठी लागतील. साहजिकच निर्यात सुरू झाल्यानंतर साधारण 15 दिवसांनी त्याचा परिणाम कांदा बाजारभावावर जाणवू लागेल. एकूणच निर्यात सुरू झाली तर बाजारपेठेत कांद्याला भाव मिळून त्याचा प्रत्यक्ष लाभ कांदा उत्पादकांना मिळू शकेल.

मात्र केंद्र सरकारने (central government) देखील कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी व जास्तीत जास्त कांदा निर्यात झाला पाहिजे यासाठी निर्यातीसाठी येणारे अडथळे, निर्यात शुल्क दूर करणे गरजेचे आहे. कांदा बाजारभावासाठी कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनीही वेळोवेळी सरकारचे लक्ष वेधले होते. साहजिकच त्याचा थेट परिणाम आता कांदा निर्यात होण्यावर होवू लागल्याने भारतातून होणार्‍या कांद्याची निर्यात ही शेतकर्‍यांसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल.

शेतकर्‍यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावा 2 जुलैपासून आपला कांदा बांगलादेशात निर्यात होण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र कांदा निर्यातीची परवानगी मिळाल्यानंतर पुढील आठ दिवसात बाजारभावात फरक जाणवेल. त्यामुळे शेतकर्‍यांनी देखील एकाच वेळी कांद्याची आवक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कांदा प्रतवारी करुन टप्प्याटप्प्याने तो विक्री करावा. कांद्याला चांगली मागणी असल्याने शेतकर्‍यांनी बाजार समितीमध्ये गर्दी करू नये.

– भारत दिघोळे, अध्यक्ष (कांदा उत्पादक शेतकरी संघटना)

- Advertisment -

ताज्या बातम्या