Saturday, March 29, 2025
Homeदेश विदेशरेल्वेचा मोठा निर्णय : १४ एप्रिलपर्यंत रेल्वेसेवा राहणार बंद; मालगाडी, अत्यावश्यक सेवा...

रेल्वेचा मोठा निर्णय : १४ एप्रिलपर्यंत रेल्वेसेवा राहणार बंद; मालगाडी, अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहणार

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २१ दिवस देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर आज भारतीय रेल्वेकडून रेल्वेसेवा १४ एप्रिलपर्यंत प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा, मालगाड्या यावेळी सुरु राहतील अशी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रवाशांनी आपली तिकिटे कॅन्सल करू नये, कॅन्सल केले तर काही फी कापली जाण्याची शक्यता आहे. मात्र, रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर पूर्णपणे परतावा केला जाईल असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना पुढील २१ दिवस देशात लॉक डाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या विनंतीनंतर देशांतर्गत विमानसेवादेखील पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तू पुढील सहा महिने पुरतील एवढा साठ आपल्याकडे असल्याचे सांगत बंद काळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur News : यापूर्वी दगडं यायची.. आता आपोआप वस्तू पेटतात; बेलापूर...

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबीयांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेत असून या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्ण दहशतीखाली आहे. या घटनेचा तातडीने तपास...