मुंबई | Mumbai
ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) होणाऱ्या आयसीसी टी २० वर्ल्डकपसाठी (ICC T20 World Cup) भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कायम ठेवण्यात आले असून के. एल. राहुलकडे (KL Rahul) उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे…
टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये दुखापतग्रस्त हर्षल पटेल (Harshal Patel) आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीवर मात करून पुन्हा एकदा मैदानात परतले आहेत.
तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दीपक चहर (Deepak Chahar) मोहम्मद शमी (Mohammed Shami) रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) यांना राखीव खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबरपासून टी २० वर्ल्डकपचा रणसंग्राम सुरु होणार असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे.
तसेच याआधी २००७ मध्ये एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आयसीसी टी २० वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारताने विजेतेपद पटकावले होते.यानंतर या स्पर्धेचे ६ वेळा आयोजन करण्यात आले असून भारताला दुसरे विजेतेपद मिळवण्यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागली आहे.
याशिवाय टी २० वर्ल्डकप अगोदर भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० सामन्यांची मालिका खेळायची असून यासाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युझवेन्द्र चहल, भुवनेश्वर कुमार, आर्षदिपसिंग, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेन्द्र चहल, अक्षर पटेल, आर्षदिपसिंग, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, लोकेश राहुल, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, हार्दिक पांड्या, युझवेन्द्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक हुडा, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
सलिल परांजपे, नाशिक