Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाइंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई । Mumbai

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, आगामी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

गाबा कसोटीत विजय संपादन केलेल्या ९ खेळाडूंना इंग्लडविरुद्ध मालिकेसाठी संघात कायम ठेवण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. तर तब्बल २९ महिन्यांच्या विश्रांतीनंतर अष्टपैलू हार्दिक पंड्याने भारतीय संघामध्ये कमबॅक केला आहे.

हार्दिक पंड्यासोबत इशांत शर्मा भारतीय संघात परतला आहे. तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनला संघात कायम ठेवण्यात आले आहे. पण तिसरी सिडनी कसोटी अनिर्णित राखणाऱ्या हनुमा विहारीला भारतीय संघात संधी मिळू शकलेली नाही.

चार कसोटींपैकी पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शानदार अर्धशतक ठोकणाऱ्या वॉशींग्टन सुंदरला संघात कायम ठेवण्यात आले आहे. रविंद्र जडेजा दुखापतीमुळे मालिकेला मुकणार आहे. ५ फेब्रुवारीपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. तर अखेरचे अहमदाबाद येथे होणारे २ सामने गुलाबी चेंडूवर खेळवले जाणार आहेत.

अशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा, शुभमन गील, मयंक अगरवाल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे, रिषभ पंत, वृद्धिमान सहा, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, मोहंमद सूरज आणि शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव. नेट बॉलर्स : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरिअर, कृष्णप्पा गौतम, राहुल चहर, सौरभ कुमार, आणि शाहबाज नदीम.

– सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या