Monday, April 6, 2026
Homeदेश विदेशIndia-US Trade Deal: टॅरिफ कमी होताच भारतीय शेअर बाजारात हिरवाई; सेन्सेक्स, निफ्टीचा...

India-US Trade Deal: टॅरिफ कमी होताच भारतीय शेअर बाजारात हिरवाई; सेन्सेक्स, निफ्टीचा ‘बुल’ रन

मुंबई | Mumbai
भारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापारी करारामुळे आज भारतीय शेअर बाजाराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा करताच गुंतवणूकदारांकडून बाजारात खरेदीचा जोर वाढला आहे. मंगळवारी सकाळी भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. आज सकाळी भांडवली बाजार उघडताच सेन्सेक्स 2200 आणि निफ्टी 700 अंकांनी वधारला.

अमेरिकेने टॅरिफ कमी केल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचे सकारात्मक पडसाद भांडवली बाजारात उमटले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे सोने आणि चांदीचे भावही वाढले आहेत.

- Advertisement -

सोमवारी जेव्हा बाजार बंद झाला होता तेव्हा मार्केट कॅप 4,55,03,877.32 कोटी रुपये होते. तर आज बाजार उघडताच तो उसळून 4,78,12,017.96 कोटी रुपये झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एका झटक्यात २३ लाख कोटींची कमाई केली. बाजारात तेजीचे सत्र कायम आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 3 टक्के तेजीसह 83,974.65 वर ट्रेड करत होता. तर निफ्टी 50 जवळपास 25,812.65 वर व्यापार करत होता. विशेष म्हणजे ‘गिफ्ट निफ्टी’ २६,१५० च्या पार गेल्याने आज बाजार विक्रमी पातळीवर बंद होण्याची दाट शक्यता आहे.

India-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर आणला टॅरिफ

सर्वच क्षेत्रातील निर्देशांक बहरले
बांधकाम क्षेत्रातील सर्व शेअर तेजीतत आहे. निफ्टी रियल्टी इंडेक्स 4 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. याशिवाय ऑटो, इन्फ्रास्ट्रक्चर, ग्राहकाभिमूख वस्तू,आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. बँकिंग शेअर्स पण तेजीत आहेत. निफ्टी खासगी बँकांचा शेअर जवळपास ३ टक्के आणि निफ्टी बँक 2.5 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. नवीन व्यापार कराराचा हा परिणाम असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

भारत अमेरिका ट्रेड डीलमुळे काय घडलं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री ट्विटवरवरुन भारतावरील कर 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याचे जाहीर केले. यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. “आज माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलणे खूप छान वाटले. मेड इन इंडिया उत्पादनांवर आता १८ टक्के टॅरिफ आकारले जाईल याचा आनंद झाला. या अद्भुत घोषणेबद्दल भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खूप खूप आभार,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब झाले.
१. टॅरिफमध्ये मोठी कपात : अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लादलेले ५०% टॅरिफ आता केवळ १८% असेल. यामुळे भारतीय कंपन्यांची निर्यात स्वस्त होऊन नफ्यात मोठी वाढ होणार आहे.
२. तेल आयातीचे नवे समीकरण : भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करून अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. या धोरणात्मक बदलामुळे जागतिक राजकारणात भारताचे वजन वाढले आहे.

ताज्या बातम्या

Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचा लढण्याचा निर्णय योग्य, राजकारणातील...

0
नवी दिल्ली | New Delhi राज्यातील बारामती आणि राहुरी (Baramati and Rahuri) या विधानसभांच्या पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात बारामतीमधून महायुतीकडून...