Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023 : भारतीय संघाला मोठा धक्का; 'हा' खेळाडू वर्ल्डकपमधून...

World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश

मुंबई | Mumbai

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (ICC ODI World Cup) स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला असून संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आयसीसीने (ICC) ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला गोलंदाजी करताना पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर आता तो आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे….

- Advertisement -

World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश

बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) पुणे (Pune) येथे झालेल्या लढतीत हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली होती. यावेळी मैदानात (Ground) त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने चालण्याचा प्रयत्न केला. पंरतु, रनअपमध्ये धावता येते का ते पाहिले पण दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्याने तो पॅव्हेलियनमध्ये परतला. उर्वरित सामन्यात तो खेळायला आला नाही. त्याच्या दुखापतीसाठी एक्स रे घेण्यात आले. त्यातून ही दुखापत गंभीर (Serious) असल्याचे स्पष्ट झाले.

देशदूत विशेष : मराठा आरक्षणाचा भाजपला फटका?

यानंतर आता हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा (Krishna) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. कृष्णाने १९ वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले असून विश्वचषकाआधी झालेल्या मालिकेत तो खेळला होता. तर हार्दिकच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल संघात येण्याची शक्यता होती. मात्र रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू उत्तम कामगिरी करत असल्याने अक्षरच्या नावाला पसंती देण्यात आली नाही. या दोघांच्या बरोबरीने अनुभवी रवीचंद्रन अश्विन संघात असल्याने अक्षरचे नाव मागे पडले. तसेच हार्दिकऐवजी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या नावाचीही चर्चा झाली होती.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये विनाशकारी भूकंप! १२९ जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

दरम्यान, हार्दिक पांड्या बाहेर गेल्याने भारतीय संघासह कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) टेन्शन वाढले आहे. कारण, हार्दिक पांड्याची उणीव संघाला जाणवणार आहे. भारतीय संघाने विश्वचषक सेमीफायनलची फेरी गाठली असली तरी साखळी फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. यात भारतीय संघाचा सामना ०५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ नोव्हेंबरला नेदरलँडशी होणार आहे. तर हार्दिकच्या जागी संधी मिळालेला प्रसिद्ध कृष्णा हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रॅक्टिस करीत होता. यानंतर शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्र्यांचे कुटुंब ड्रग्ज व्यवहारात सहभागी आहे का?; एल्विस प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

- Advertisment -

ताज्या बातम्या