नाशिक । सलिल परांजपे
भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघांमध्ये २७ जूलै ते ७ ऑगस्ट दरम्यान द्विपक्षीय मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये तीन टी २० आणि तीन वनडे क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. टी २० सामने पाल किल्ले येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता खेळविण्यात येणार आहेत. तर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला २ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. हे सामने कोलंबो येथे भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता खेळविण्यात येणार आहेत.
या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे क्रिकेट संघात हर्षित राणा, रियान पराग,या नव्या चेहऱ्यांना पदार्पण करण्याची संधी असणार आहे.टी २० मालिकेचे कर्णधारपद सुर्य कुमार यादव कडे असणार आहे. तर रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कर्णधारपद भुषविणार आहे. विशेष म्हणजे शुभमन गील कडे दोन्ही संघांचे उपकर्णधारपद असणार आहे.
वनडे मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे श्रेयस अय्यरचे वनडे संघात कमबॅक झाले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने २०२१ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाचा शेवटचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शिखर धवन च्या नेतृत्वात २-१ ने मालिका विजय संपादन केला होता. तर टी २० मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला होता.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा, शुभमन गील, रिषभ पंत, विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, महंमद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग,अक्षर पटेल, हर्षित राणा, खलील अहमद.
टी २० संघ:
सुर्य कुमार यादव, रिंकुसिंग, यशस्वी जयस्वाल, शुभमन गील,रिषभ पंत, रियान पराग, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन,शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदिपसिंग,खलील अहमद, महंमद सिराज