Tuesday, April 29, 2025
Homeक्रीडाइंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई । Mumbai

भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test series) अखेरचा कसोटी सामना एजबॅस्टन (Edgbaston) येथे १-५ जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे…

- Advertisement -

भारतीय संघाला (Indian team) इंग्लंड दौऱ्यावर (England tour) ३ एकदिवसीय ३ टी २० आणि एक कसोटी सामना खेळायचा आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी सामन्याने होणार आहे. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. एजबॅस्टन (Edgbaston) येथे होणारा पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना जिंकून २००७ मध्ये राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० असे पराभूत केले होते.

आता तब्बल १५ वर्षाच्या दीर्घ विश्रांतीनंतर भारतीय संघाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली इतिहास रचण्याची संधी आहे. ऑगस्ट २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत या कसोटी मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भारतीय संघात कोरोनाने शिरकाव (Corona Infiltration) केल्यामुळे या मालिकेतील अखेरचा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला होता.

त्यानंतर तब्बल १ वर्षाच्या दीर्घ विश्रांतीनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय कसोटी संघाची काल रविवारी घोषणा करण्यात आली आहे.

या कसोटी संघात चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघातून अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) डच्चू देण्यात आला आहे. शिवाय या संघातून मयंक अगरवालला (Mayank Agarwal) देखील वगळण्यात आले आहे.

भारतीय कसोटी संघ असा

रोहित शर्मा , शुभमन गिल , लोकेश राहुल , विराट कोहली , चेतेश्वर पुजारा , श्रेयस अय्यर , श्रीकर भरत , रिषभ पंत यष्टीरक्षक शार्दूल ठाकूर , हनुमा विहारी, रविंद्र जडेजा , आर अश्विन , मोहंमद शमी , जसप्रीत बुमराह , उमेश यादव , मोहंमद सिराज आणि प्रसिध कृष्णा .

सलिल परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....