Monday, November 25, 2024
Homeक्रीडाICC World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण;...

ICC World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण; पाहा Video

मुंबई | Mumbai

आशिया चषक (Asia Cup) जिंकल्यानंतर आता भारतीय संघ (Indian Team) वनडे विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. येत्या ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आयसीसी वनडे विश्वचषकाचे (ICC ODI World Cup) आयोजन करण्यात येणार आहे. भारतात खेळविण्यात येणाऱ्या या आयसीसी विश्वचषकाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून या स्पर्धेसाठी Adidas ने भारतीय संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे…

- Advertisement -

Supriya Sule : चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून सुप्रिया सुळे लोकसभेत भाजपवर बरसल्या

प्रसिद्ध भारतीय गायक रफ्तारने (Singer Raftar) गायलेल्या ‘३ का ड्रीम’ या गाण्याद्वारे बहुप्रतिक्षित जर्सी रिलीज करण्यात आली. ‘ड्रिम ऑफ ३’ हे लाखो चाहत्यांचे प्रतीक आहे जे त्यांच्या संघाला १९८३ आणि २०११ नंतर तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकताना पाहण्याचे स्वप्न पाहतात.

Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक लागू झाल्यास महाराष्ट्राचे राजकारण ‘असं’ बदलणार; जाणून घ्या सविस्तर

Adidas ने भारतात खेळविला जाणारा हा विश्वचषक साजरा करण्यासाठी मेन इन ब्लू जर्सीमध्ये सुधारणा केली आहे. त्यांनी खांद्यावरील तीन पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी चमकदार तिरंगा (Tricolor) लावला आहे. तर बीसीसीआयच्या (Bcci) लोगोमध्ये छातीच्या डाव्या बाजूला दोन तारे आहेत, जे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचे प्रतीक आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडूही दिसत असून नव्या जर्सीचा हा व्हिडीओ सगळेच उत्सुकतेने पाहतांना दिसत आहे.

Women Reservation Bill : महिला आरक्षणाबाबत बाळासाहेबांची भूमिका काय होती? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाच वेळच्या चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने सुरुवात करणार आहे. यानंतर ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; जंगली प्राणी आडवा आल्याने भरधाव कार उलटली

विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव

Nashik News : जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पुन्हा बंद; व्यापारी संपावर, ‘हे’ आहे कारण

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या