Sunday, December 15, 2024
Homeदेश विदेशAditya-L1 कडून वैज्ञानिक डेटा गोळा करायला सुरुवात, ISRO ची माहिती

Aditya-L1 कडून वैज्ञानिक डेटा गोळा करायला सुरुवात, ISRO ची माहिती

दिल्ली | Delhi

आदित्य एल-1 देशवासियांना आनंदाची बातमी दिली आहे. आदित्य एल 1 मंगळवारीच पाचव्यांदा आपली कक्षा बदलणार आहे. मात्र, त्याआधी सोमवारी आदित्य-एल1 मिशनबाबत मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

- Advertisement -

आदित्य एल-1 वैज्ञानिक डेटा गोळा करणे सुरू केले आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा जास्त अंतरावरुन सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत करतो.

ISRO ने शेअर केलेल्या आलेखात ऊर्जावान कण वातावरणातील भिन्नता दर्शविल्या आहेत. एका युनिटद्वारे माहिती गोळा केली जात आहे. आदित्य L1 ने डेटा संकलनाचा हा दुसरा टप्पा आहे. लवकरच शास्त्रज्ञांना सूर्याची अनेक रहस्ये माहिती होतील. Aditya-L1 मध्ये स्थापित केलेल्या STEPS उपकरणाद्वारे हे काम केले जात आहे. या उपकरणात 6 सेन्सर्स आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या दिशांमधून सुप्रा थर्मल आणि ऊर्जावान आयनांची माहिती गोळा करतील ज्यांची श्रेणी 20 keV/न्यूक्लिओन ते 5 MeV/न्यूक्लिओन दरम्यान असेल. हे उपकरण जे डेटा देईल ते पृथ्वीभोवती असलेल्या कणांबद्दल, विशेषतः तिच्या चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती जाणून घेण्यास मदत करेल. हे उपकरण 10 सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून 50 हजार किमी अंतरावरून कार्यान्वित करण्यात आले, ही भारतीय शास्त्रज्ञांची मोठी उपलब्धी मानली जाते.

आदित्य एल-1 हे 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याचे रहस्य समजण्यास मदत होणार आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर सर्वांच्या नजरा आदित्य एल 1 कडे लागल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या