Tuesday, September 24, 2024
Homeमुख्य बातम्याभारताची आर्थिक स्थिती चांगली : सीतारामन

भारताची आर्थिक स्थिती चांगली : सीतारामन

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

- Advertisement -

भारताची आर्थिक परिस्थिती ( India’s economic condition)चांगल्या स्थितीत आहे. देशाची आर्थिक बाजारपेठ ही सुशासित आणि सुनियमित आहे. गौतम अदानी यांच्यासंबंधी सुरू असलेल्या वादामुळे गुंतवणूकदारांवर कोणताही परिणाम होणार नाही.

जागतिक स्तरावर काहीही बोलले तरी भारताची आर्थिक बाजारपेठ ही किती सुशासित आहे, याच्यासारखे उत्तरउदाहरण कुठेही नसणार, असे असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Finance Minister Nirmala Sitharaman)यांनी दिले आहे.

अमेरिकास्थित गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर फसवे व्यवहार आणि समभागांच्या किमती फुगवणार्‍या लबाड्यांसह अनेक आरोप केले आहेत.

परिणामी अदाणी समूहाच्या बहुतांश कंपन्यांचे समभाग घसरले आहेत. त्यामुळे अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे तब्बल 8.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, ‘हिडेंनबर्ग’च्या आरोपांनतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घालत चौकशीची मागणी केली आहे.

यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाष्य केले आहे. भारतीय जीवन आयुर्विमा ( एलआयसी ) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ( एसबीआय ) यांच्या प्रमुखांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एलआयसी आणि एसबीआयची अदाणी समूहात गुंतवणूक ही मर्यादेतच आहे. बँक आणि एलआयसी दोन्ही फायद्यात आहे, असे निर्मला सीतारमन यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या