Saturday, May 18, 2024
Homeनगरभारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ भंडारदऱ्यात!

भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ भंडारदऱ्यात!

अकोले । प्रतिनिधी

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी आणि शेतकरी वर्गासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरण लवकरच १०० वर्षे पूर्ण करीत आहे. या कालावधीत भरगच्च कार्यक्रम घेऊन भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ भंडारदरा येथे सुरू करण्याचा प्रयत्न आमदार सत्यजित तांबे यांनी सुरु केले असून त्या संदर्भाने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला. फडणवीस यांना देखील या उपक्रमाची तातडीने दखल घेत भंडारदरा येथे वाटर म्युझियम सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी असे आदेश दिले असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी ट्विट करत दिली आहे.

- Advertisement -

सत्यजित तांबे यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच १०० वर्ष पूर्ण होत आहेत. भंडारदारा धरण नसते तर काय झाले असते याचा विचार सुध्दा नगर जिल्ह्यातील लोक करु शकत नाहीत. सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परीसर हा देश-विदेशातील पर्यटकांदेखील प्रिय. भंडारदारा धरणाच्या शतक महोत्सवाच्या निमित्त एक भव्य कार्यकम्र करण्याचा आमचा मानस आहे, त्या निमित्ताने ह्या परीसरात भारतातील पहिले “वॉटर म्युझियम” करण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावी ही मागणी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांना संकल्पना खूप आवडली व तातडीने कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले.”

- Advertisment -

ताज्या बातम्या